Posts

श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती

Audio श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती ॥धृ॥ ब्रम्हा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरुचा कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रीऋषीचा धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुगुट शोभे जटेचा कंठी रुद्राक्ष माळ धरुनी,हातामधे अयुधे बहुत वरूनी , तेणे भक्तांचे क्लेश हरूनी,त्यासी करूनी नमन अघशमन होईल रिपुदमन, गमन असे त्रिलोक्यावरती ……… ओवाळीतो प्रेमे आरती॥१॥ गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेसी भीमा अमर संगमासी भक्ती असे बहूत सुशिष्यांची वाट दावूनीया योगाची ठेव देत असे निज मुक्तीची काशी क्षेत्री स्नान करितो करविरी भिक्षेला जातो माहुरी निद्रेला वरीतो तरतरीत छाती, भरजरित नेत्र, गरगरित शोभतो त्रिशुळ जया हाती ……… ओवाळीतो प्रेमे आरती ॥२॥ अवधुत स्वामी सुखानंदा ओवाळीतो सौख्यकंदा तारी हा दास रुदनकंदा सोडवी विषय मोहछंदा आलो शरण अत्रीनंदा दावी सद्गुरु ब्रम्हनंदा चुकवी चौरयांशीचा फेरा घालीती षडरिपू मज घेरा गांजीती पुत्र पौत्र दारा वदवी भजन मुखी, तव पूजन करीत असे सुजन तयांचे या दासावरती ……… ओवाळीतो प्रेमे आरती ॥३॥

उद्धरी गुरुराया

 Audio उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ॥ध्रु॥ जो अनसूयेच्या भावाला भुलूनिया सुत झाला, दत्तात्रेय अशा नामाला मीरवी वंद्य सुरांना, तो तू मुनीवर्या, निज पाया, स्मरता वारीसी माया ||१|| जो माहुरपूरी शयन करी, सह्याद्रीचे शिखरी निवसे गंगेचे स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी स्मरता दर्शन दे, वारी भया, तो तू आगमगेया ||२|| तो तू वांझेसी सुत देसी सौभाग्या वाढविसी मरता प्रेतासी जीववीसी सद्वरदाना देसी यास्तव वासुदेव तव पाया, दरत्या तारी सदया ||३||

करितो प्रेमे तुज निरांजन

 Audio करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवूनिया मन।     दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ॥धृ.॥ धरतीवर नर पीडित झाले भावरोगें सर्व।  कामक्रोधादिकरिपुवर्गे व्यापुनि सगर्व।  योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व।  सुलभपणे निजभजने त्यांसी उद्धरी जो शर्व॥१॥ अत्रिमुनीच्या सदनी तीनी देव भुकें येती।  भिक्षुक होउनी अनुसूयेप्रति बोलति त्रयमूर्ती।  नग्न होउनी आम्हांप्रति द्या अन्न असें वदति।  परिसुनि होउनी नग्न अन्न दे तंव ते शिशु होती ॥२॥ दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रथमेंद्र ! ब्रह्मदेव तो चंद्र जाहला तो उपेंद्र ! दत्तात्रेय जो वीतनित्र तो तारक योगींद्र ! वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्य अतंद्र ॥३॥ करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवूनिया मन। दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ॥धृ.॥

स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त

Image
  Audio   रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात , त्याचा लागे ना अंत -२ स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त ll धृ. ll दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात , अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात , दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात ll १ ll हो त्याचा लागे ना अंत....-२ भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत , रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात , कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त ll २ ll हो त्याचा लागे ना अंत..... -२ श्वानांची फौज होती त्यांच्या संगत , श्वानांना भाकर टाकत होते भगवंत , बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात ll ३ ll हो त्याचा लागे ना अंत....... -२ भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत , खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात , गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा, ठेवा ध्यानात ll ४ ll हो त्याचा लागे ना अंत........ -२

कालभैरवाष्टक

Image
  Audio देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्   नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे॥ १॥   भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् । कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे॥२॥   शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् । भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥३॥   भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् । विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥४॥   धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् । स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ५॥   रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम् । मृत्युदर्पनाशनं कराळदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥६॥   अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् । अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं

दत्तस्तुती

    जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् ।   सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥ १॥   अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः ।   अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता ।   श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥   जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे ।   भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १॥   जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च ।   दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ २॥   कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च ।   वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ३॥   र्हस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र-विवर्जित ।   पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ४॥   यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च ।   यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ५॥   आदौ ब्रह्मा मध्य विष्णुरन्ते देवः सदाशिवः ।   मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ६॥   भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे ।   जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ७॥   दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपध्राय च ।   सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ८॥