स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त
रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात,
त्याचा लागे ना अंत -२
स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त llधृ.ll
दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात,
अल्लख
म्हणुनी भिक्षा मागत आले दारात,
दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात ll१ll
हो त्याचा लागे ना अंत....-२
भगवी
झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत,
रुद्राक्षांच्या
माळा होत्या त्यांच्या गळ्यात,
कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त ll२ll
हो त्याचा लागे ना अंत..... -२
श्वानांची
फौज होती त्यांच्या संगत,
श्वानांना
भाकर टाकत होते भगवंत,
बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात ll३ll
हो त्याचा लागे ना अंत....... -२
भक्तांचा
मेळा होता त्यांच्या संगत,
खडावांचा
नाद घुमतो माझ्या कानात,
गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा, ठेवा ध्यानात ll४ll
हो त्याचा लागे ना अंत........ -२
Comments
Post a Comment
Thanks for feedback