उद्धरी गुरुराया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ॥ध्रु॥
जो अनसूयेच्या भावाला भुलूनिया सुत झाला,
दत्तात्रेय अशा नामाला मीरवी वंद्य सुरांना,
तो तू मुनीवर्या, निज पाया, स्मरता वारीसी माया ||१||
जो माहुरपूरी शयन करी, सह्याद्रीचे शिखरी
निवसे गंगेचे स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी
स्मरता दर्शन दे, वारी भया, तो तू आगमगेया ||२||
तो तू वांझेसी सुत देसी सौभाग्या वाढविसी
मरता प्रेतासी जीववीसी सद्वरदाना देसी
यास्तव वासुदेव तव पाया, दरत्या तारी सदया ||३||
Comments
Post a Comment
Thanks for feedback