करितो प्रेमे तुज निरांजन
करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवूनिया मन।
दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ॥धृ.॥
धरतीवर नर पीडित झाले भावरोगें सर्व।कामक्रोधादिकरिपुवर्गे व्यापुनि सगर्व।
योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व।
सुलभपणे निजभजने त्यांसी उद्धरी जो शर्व॥१॥
अत्रिमुनीच्या सदनी तीनी देव भुकें येती।
भिक्षुक होउनी अनुसूयेप्रति बोलति त्रयमूर्ती।
नग्न होउनी आम्हांप्रति द्या अन्न असें वदति।
परिसुनि होउनी नग्न अन्न दे तंव ते शिशु होती ॥२॥
दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रथमेंद्र !
ब्रह्मदेव तो चंद्र जाहला तो उपेंद्र !
दत्तात्रेय जो वीतनित्र तो तारक योगींद्र !
वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्य अतंद्र ॥३॥
करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरवूनिया मन।
दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ॥धृ.॥
Comments
Post a Comment
Thanks for feedback