अपराध क्षमापन स्तोत्र

Audio ऐका. 

अपराध क्षमा आता केला पाहिजे 
गुरू हा केला पाहिजे ।
अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ।।ध्रु।।

नकळेची टाळविणा वाजला कैसा 
गुरू हा वाजला कैसा ।
अस्ताव्यस्त पडे नाद झाला भल तैसा।। 1 ।।

नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर 
गुरू हा कंठ सुस्वर । 
झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ।। 2 ।।

निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे 
गुरू हे वेडे वाकुडे 
गुणदोष न लावावा  सेवका कडे।। 3।।

अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरू हा केला पाहिजे ।अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ।।

Comments

Popular posts from this blog

स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त

श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती

उद्धरी गुरुराया