धन्य धन्य हो प्रदक्षिणा
Audio ऐका.
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची।
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची।। धृ.।।
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी।
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी।। १।।
मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती।
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती।। २।।
कोटि ब्रह्महत्या हरिती करितां दंडवत।
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।। ३।।
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि।
अनुभव जे जाणति ते गुरुपदिचे अभिलाषी।। ४।।
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला।। ५।।
Comments
Post a Comment
Thanks for feedback